Tuesday, August 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मित्राची प्रगती पाहवत नसल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात घातला दगड ; मांजरी येथील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 25 August 2026, 12:19

हडपसर : मित्राची प्रगती पाहवत नसल्याच्या रागातून झालेल्या जुन्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. मामाच्या नवीन घराच्या बांधकामावरून शिवीगाळ करत एका तरुणाने मित्राच्या डोक्यात दगड घातल्याची धक्कादायक घटना मांजरी परिसरात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अभिजित बाळू गायकवाड (वय 21, रा. माळवाडी, मांजरी) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी बादल विकास नरसिंगे (वय 20, रा. माळवाडी, मांजरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित गायकवाड हे इलेक्ट्रिशियन असून त्यांचे मामा सुनिल लोंढे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अभिजित हे घराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांचा तोंडओळखीचा मित्र बादल नरसिंगे तेथे आला आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागला.

मामाच्या नवीन घराच्या बांधकामावरून बादलच्या मनात राग असल्याने त्यांची प्रगती त्याला पाहवत नसल्याने तो नवीन घराचे बांधकामावरुन वारंवार त्यांच्यासोबत भांडण करीत असे. या जुन्या वादातून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी त्यास शिवीगाळ का करतो, असे विचारले असता त्याने जवळच पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात घातला.

 

त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. फिर्यादी व मित्रांचा आरडाओरडा ऐकून त्यांची आजी नंदबाई लोंढे तेथे आल्या. त्यांनी अभिजित यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी मांजरी पोलिसांनी बादल नरसिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दौंडमध्ये कारचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून कोयता, रॉड अन् पिस्तूल दाखवत कुटुंबावर जीवघेणा हल्ला ; 2 तरुण गंभीर तर 6 जणांना बेड्या..

Tuesday, 25 August 2026, 12:55

मित्राची प्रगती पाहवत नसल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात घातला दगड ; मांजरी येथील घटना

Tuesday, 25 August 2026, 12:19

“तू ये, तुझा खेळच संपवून टाकतो!” अभिजीत दिपके यांना थेट धमकी; प्रकरणाने उडवली खळबळ

Tuesday, 25 August 2026, 12:08

भिगवणमध्ये लॉज-हॉटेलच्या आड ‘कथित’ देहविक्रीचा बाजार? रात्रीची वर्दळ वाढली; पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

Tuesday, 25 August 2026, 12:07

नायगाव व प्रयागधाम येथील दोन विद्युत रोहित्र फोडून तांबे- अ‍ॅल्युमिनियमच्या तारांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 25 August 2026, 11:41

अतिदक्षता विभागात नेमकं काय घडलं? 3 निष्पाप बाळांचा जीव वाचवता आला असता; दुर्घटनेचं धक्कादायक कारण अखेर समोर

Tuesday, 25 August 2026, 11:35
Next Post

दौंडमध्ये कारचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून कोयता, रॉड अन् पिस्तूल दाखवत कुटुंबावर जीवघेणा हल्ला ; 2 तरुण गंभीर तर 6 जणांना बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp