पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, अनेक प्रयत्नही केले जातात. पण अनेकदा संधी हुकतेच. मात्र, आता तुम्हाला एका सरकारी संस्थेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. ‘आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ येथे अनेक रिक्त पदावंर भरती केली जात आहे.
मुंबईतील आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे लेखा सहाय्यक (कुशल), लेखा सहाय्यक (अर्धकुशल), सहाय्यक (अर्धकुशल), सहाय्यक (तांत्रिक), अकुशल (बहुकुशल) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही 12 डिसेंबर 2024 रोजी ‘आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’, हॉटेल आरुष रेसिडेन्सी, प्लॉट नंबर 53, ब्रह्मा बिल्डिंग, सेक्टर 15, 15, सीबीडी एस बेलापूर, नवी मुंबई, 400614 येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://alimco.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.