पुणे : मुंबईतील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे ट्रेनी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 25,000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.hindustanpetroleum.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकीमध्ये पदवी.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 25,000/-.
– वयोमर्यादा : 18-25 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2025