राहुलकुमार अवचट
यवत – श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहाळा आयोजित करण्यात आला असुन आज सायंकाळी श्री काळभैरवनाथ मंदिर येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी व भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिंडी सोहळ्याच्या सुरुवातीला असलेल्या मंगलमय नगारावादनाने परिसर भक्तिमय झाल्या याबरोबर शाळकरी विद्यार्थी यांचा ज्ञानोबामाऊली तुकाराम जयघोष, हरिनामाचा गजर, वारकरी व महिलांची सांप्रदायिक भजने , अभंग यामुळे यवतनगरी हरिनामाने दुमदुमली होती आज रात्री १२ श्रीकाळभैरवनाथ जन्मोत्सव होणार आहे, दिंडी सोहळ्यास विद्या विकास मंदिर, यवत शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांसह ग्रामस्थ पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते.