राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला आहे.या वनभोजनासाठी ग्रामस्थांनी उस्फूर्त सहभाग घेतला(Yavat News)
गोड जेवणा बरोबरच भेळ यावर मारला ताव.
दरवर्षीप्रमाणे यवत येथे अनेक वर्षाची परंपरा जपत आषाढ महिन्यात एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जावून वनभोजनाचा आनंद घेतात. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाचे वेगाने शहरीकरण होत असुनही
सुमारे २५ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या अनेक वर्षापासुन चालत आलेली जुनी परंपरा यवत ग्रामस्थांच्या वतीने जपली जात आहे.(Yavat News)
यवत ग्रामस्थांनी सकाळी ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ व ग्रामदेवी श्री महालक्ष्मीची मातेची ग्रामप्रदक्षिणा घातली. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य व नारळ फुडून घरे व दैनंदिन व्यवहार बंद करुन वनभोजनासाठी गावाबाहेर पडले. गावातील हॉटेल, किराणा, तसेच सर्व दुकानदारांनी दुकाने उत्फूर्तपणे बंद ठेवली होती.(Yavat News)
दरम्यान, रविवार असल्याने बँका, शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे गावात शुकशुकाट पाहायला मिळाला. आषाढ महिना असल्याने श्री महालक्ष्मी मातेच्या यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंची बंद असल्याने काही प्रमाणात तारांबळ झाली. मात्र सायंकाळी पुन्हा ५ च्या सुमारास नागरिक गावात परत येत दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरू झाले.(Yavat News)
गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना वनभोजनासाठी गाव बंद असल्याचे सांगितल्यावर या परंपरेबद्दल त्यांचे कुतूहल निर्माण झाले. ग्रामस्थांनी गावच्या शिवेवर, तसेच आपआपल्या शेतात सोयीनुसार समूहाने जाऊन गोडधोड जेवण भेळ, बेसन भाकरी यासह वनभोजनाचा आनंद लुटला. तर तरुणाई भुलेश्वर, नारायणपूर, केतकावळे बालाजी यांसह आदी पर्यटन स्थळाला भेट दिली. तर काही जणांनी माळशेज, लोणावळा आदी ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले.