Yavat News : यवत : पुणे महानगर परिवहन महामंडळाने पीएमआरडीए व ग्रामीण हद्दीत बससेवा सुरु केली आहे. मात्र, एसटीच्या तुलनेत तिकीट दर कमी असल्याने पीएमपीएल प्रशासनाला उत्पन्न कमी मिळत होते. त्यामुळे पुणे ग्रामीण हद्दीत दैनिक पास ७० रुपये व मासिक पास १४०० रुपये असलेला गेल्यावर्षी १ एप्रिलपासून बंद करण्यात आला होता. परंतु, पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीबाहेरील पीएमआरडीए व लगतच्या ग्रामीण भागातील नोकरदार, महिला व लोकप्रतिनिधी यांनी पूर्वीप्रमाणे दैनिक व मासिक पास सुरू करावा अशी मागणी करत होते.
दैनिक पास ७० रुपये तर मासिक पास २७०० रुपये होणार
ग्रामीण भागातून शहरात विविध काम व नोकरीनिमित्त तसेच शाळा व कॉलेजसाठी प्रवासी व विद्यार्थी ये-जा करत असल्याने त्यांची पंचाईत होत होती, परंतु, नुकत्याच झालेल्या बैठकीत सोमवार (४ सप्टेंबर) पासून दैनिक पास ७० रुपये तर मासिक पास २७०० रुपये करण्याची घोषणा पीएमपीएलच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सहव्यवस्थापकीय संचालक (Yavat News) यांनी मान्यतासह पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी आदेश दिले आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीबाहेरील पीएमआरडीए व लगतचे ग्रामीण संचलन क्षेत्रातील नोकरदार, महिला व लोकप्रतिनिधी यांनी पुर्वीप्रमाणे दैनिक व मासिक पास सुरू करणेची आग्रही मागणी केली होती.
संचालक मंडळाचे बैठकीतील निर्णय व मान्यता यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हदी बाहेरील पीएमआरडीए व लगतचे ग्रामीण संचलन क्षेत्रातील प्रवाशाकरीता दैनिक पास १२० रुपये व मासिक पास २७०० रुपये अशी नव्याने (Yavat News) बस प्रवास पासेसची सुविधा सोमवार (४ सप्टेंबर) पासून सुरू करण्यात येणार असून सदरचे दैनिक पासेस हे बस मधील कर्तव्यास असलेल्या वाहकाकडून (कंडक्टर) ई-तिकिट मशिनमधून वितरीत केले जाणार आहेत
दरम्यान, पुर्वीच्या कार्यपध्दतीनुसार दैनिक पासेस वितरीत करण्यात यावे, तसेच सध्या चलनात असलेले दैनिक पास ४० रुपये (एका मनपा हदीकरीता) दैनिक पास ५० रुपये (दोन्ही मनपा हद्दीकरीता) दैनिक पास ४० रुपये (ज्येष्ठ नागरिकांसाठी) संपूर्ण संचलन हद्दीपर्यंत या दरामध्ये कोणताही बदल करणेत आलेला नसून ते पूर्वीप्रमाणेच वितरीत करण्यात येणार आहेत.
एका मनमा हद्दीतील मासिक पास ९०० रुपये व दोन्ही मनपा हद्दीतील मासिक पास १२०० रुपये, ज्येष्ठ नागरिक मासिक पास ५०० रुपये व दोन्ही मनपा हदीचे बाहेर पीएमआरडीए हदीतील संचलन क्षेत्राकरीता नव्याने सुरू करणेत आलेला २७०० रुपये या मासिक पास मिळणार आहे.हे सर्व पासेस प्रवाशांना पास केंद्रावर उपलब्ध होतील व पूर्वीप्रमाणेच असलेले मासिक पासेसमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने (Yavat News) प्रचलीत कार्यपध्दतीने पास केंद्रावर वितरीत करण्यात येणार आहेत. पास केंद्रावरील सेवकांनी नव्याने सुरू केलेल्या सुविधेबाबतची माहिती सर्व प्रवाशांना देण्यात यावी असे निर्देश पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिले आहेत
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : शेतातून जात असताना दाम्पत्याला चुलत्यासह भावांकडून बेदम मारहाण
Yavat News : टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; पाटस येथील घटना
Yavat News : पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपूर येथे टेम्पो व ट्रेलरची धडक होऊन अग्नीतांडव