राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. असे असताना पालखी सोहळाच्या तोंडावरच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सेवामार्गाची दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सेवामार्ग यवत येथे सेवा रस्ता सुरू होतो. तेथेच सेवा रस्त्यावर चढ-उतार, स्टेशन रोड, गजानन इलेक्ट्रिक, एसटी स्टँड परिसर, शाळेच्या जवळ ठिकाणी अनेक खड्डे पडलेले असून यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा लहान अपघात देखील घडलेले आहेत. (Yavat News) अचानक खड्डा आल्याने अनेक दुचाकीस्वार पडत असून तर महालक्ष्मी हॉटेल समोर रस्त्यावर माती साठल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. श्री काळभैरवनाथ मंदिरा शेजारी असलेल्या महामार्गापुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असून येथे दुर्गंधी पसरलेली आहे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. १५ रोजी दौंड तालुक्यात आगमन होत असून पालखी यवत मुक्कामी येत आहे.
पालखी मार्गावर अनेक समस्या
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी पालखी व्यवस्थापक आणि प्रशासनाने केली आहे. पालखी महामार्गावर कोणतेही प्रकारची गैरसोय होऊ नये,पालखी मुक्काम स्थळाची व विसाव्याच्या ठिकाणी कोणतेही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता प्रशासन दरवर्षी घेत असते. यंदाही शासकीय अधिकाऱ्यांनी पालखी महामार्गाची पाहणी केली. (Yavat News)
मात्र पालखी महामार्गावर अनेक समस्या असून पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील यवत, चौफुला ,वरवंड, पाटस सेवा रस्त्यांवर खड्डे पडल्याने दुरावस्था झालेली असून सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून दुरुस्त करावे अशी मागणी यवत परिसरातील नागरिक करीत आहेत.
सेवा रस्त्यावरील भुयारी गटारांमध्ये गाळ साठून असल्याने प्राथमिक शाळेसमोर असलेल्या भुयारी मार्गामध्ये पाणी साठत असून यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. (Yavat News) कासुर्डी ते यवत परिसरात अंधार होत असल्याने या परिसरात हाय मस दिवे लावण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व पाटस टोल प्लाझा कंपनीने याबाबत लवकर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.