नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात आता Xiaomi India ने Republic Day Sale ची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत कंपनी आपल्याला स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, ऑडिओ गॅजेट्स आणि इतर स्मार्ट होम डिव्हाइसेसवर सूट मिळणार आहे.
जर तुम्ही नवीन फोन किंवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Xiaomi च्या या सेलचा फायदा घेऊ शकता. तुम्ही 11,999 रुपयांत Redmi 13C 5G खरेदी करू शकता. तर Redmi A4 5G या सेलमध्ये 8,299 मध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरसह येतो. याशिवाय, तुम्ही या सेलमधून 19,999 च्या किमतीत Redmi Pad Pro खरेदी करू शकता.
तसेच Xiaomi Powerbank 4i या सेलमध्ये 1899 रुपयांना उपलब्ध असणार आहे. ही पॉवर बँक 20000mAh बॅटरीसह येते. याशिवाय तुम्ही Redmi Buds 6 2799 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनी इतर प्रॉडक्ट्सवरही ऑफर देत आहे.