पुणे: महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या दिनदर्शिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांचे नाव चुकीचे छापल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. लवांडे यांनी एक ट्विट करत दिनदर्शिकेचा फोटो प्रसिद्ध केला आहे.
”राज्याच्या वनविभागाने 2024 च्या दिनदर्शिका मुखपृष्ठावर अजित पवारांच्या वडिलांचे नाव का बदलले? परवा एका गाडीत गर्दीत कोंबून बसवले होते. त्यांचे अधिकारकमी केले. कोणताही अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस करतात. आम्हाला प्रश्न पडलाय की, भाजपा अजितदादांची वारंवार इतकी हेळसांड का करत आहे? आणि अजितदादा मित्र मंडळ हे कसं सहन करतात?” असं लवांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राज्याच्या वनविभागाने 2024 च्या दिनदर्शिका मुखपृष्ठावर @AjitPawarSpeaks दादांच्या वडिलांचे नाव का बदलले ? परवा एका गाडीत गर्दीत कोंबून बसवले होते. #DCM म्हणून अधिकार कमी केले कोणताही अंतिम निर्णय @Dev_Fadnavis करतात. आम्हाला प्रश्न पडलाय की @BJP4Maharashtra#भाजपा अजितदादांची… pic.twitter.com/BA4jYgRRCY
— Vikas Lawande (@VikasLawande1) January 25, 2024