सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अनेकांना जमत नाही. त्यात आपल्यापैकी अनेकजण लॅपटॉपवर तासनतास काम करतात. पण, तुमचं हे करणं डोळ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. असा एक फॉर्म्युला आहे तो तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
तुमचे डोळे नियमितपणे तपासा. वर्षातून एकदा किंवा दोनदा डोळे तपासा. यामुळे डोळ्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे का ते कळेल. याच्या मदतीने डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारची समस्या लवकर ओळखून त्यावर उपचार करता येऊ शकतात. 20-20-20 नियमाचे पालन करा. प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल आणि थकवा कमी होईल. स्क्रीन ब्राईटनेस कमी करा. लॅपटॉप स्क्रीनची ब्राईटनेस कमी केल्याने डोळ्यांवरील ताण कमी होईल. तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ब्राईटनेस नीट करू शकता.
नियमित ब्रेक घ्या. दर तासाला काही मिनिटे ब्रेक घ्या. ब्रेकदरम्यान तुम्ही खिडकीतून बाहेर पाहू शकता किंवा फिरायला जाऊ शकता किंवा चहा पिऊ शकता. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल. याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहू शकते. स्क्रीनची उंची स्थिर ठेवा. जेणेकरून आपल्याला वर किंवा खाली पाहावे लागणार नाही. यामुळे मानेवर आणि डोळ्यांवर कमी दाब पडेल.