दिनेश सोनवणे
दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रावणगाव (ता. दौंड) येथील पुलातील ड्रेनेज लाईनचे काम खराब निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसून महामार्ग व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करीत आहे. असा संतप्त सवाल रावणगाव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे
महामार्ग रस्ता दुरुस्तीच्या वेळी फुलाची उंची कमी केल्याने या ठिकाणी पावसाचे पाणी कायम साठत आहे यंदा परिसरात मोठा पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता त्यामुळे ग्रामस्थांना या पुलातून येजा करताना अडचण निर्माण होत होती ग्रामस्थांचा तक्रारीनंतर टोल व्यवस्थापनाने गटार दुरुस्तीचे काम हाती घेतले मात्र त्याचे ड्रेनेज सेवा रस्त्यावर काढूनच कच्चे काँक्रीट टाकल्याने हा रस्ता उखडलेला आहे कामकाज करताना तीन दिवस रस्ता आडवुन धरल्याने अनेक नागरिकांना या ठिकानाहून प्रवास करताना कसरत करावी लागत होती
दरम्यान, सद्या ग्रामीण भागात पाऊस जास्त पडला आहे.या परिसरात रस्त्याच्या कडेला पाण्याची डबकी साचले आहेत.आणि सद्या डेंगू, हिवताप, या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आणि त्यातच येथील ड्रेनेज लाईन मधुन सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने रोगराई वाढण्याची शक्यता नाकारू शकत नाही. या मुळे प्रशासनाने वेळेच दखल घेणे आवश्यक आहे.
रावणगाव येथील पाटबंधारे वसाहती समोरील मोरीतही मोठ्या प्रमाणावर पाणी व गाळ असल्याने ग्रामस्थांना येजा करता येत नाही महामार्ग टोल व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहे तातडीने या मोरी मधील गाळ काढून लाईट चालू न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.