ठाणे : योगगुरु रामदेव बाबा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, काही घातले नाही तरी चांगल्या दिसतात, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
ठाण्यात योगगुरु रामदेव बाबा एका योगा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात महिलांसाठी योगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र योगानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना त्यांनी योगासाठी घातलेले ड्रेस बदलता आले नाहीत.
योगा कार्यक्रमानंतर महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही.
याबाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, “साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, साड्या नेसून पण चांगल्या वाटता. महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्यासारखे काही नाही घातले तरी चालते.