लोणी काळभोर : अष्टविनायकापैकी प्रसिद्ध असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे एका महिलेवर गोळीबार केल्याचे धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 27) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शीतल अक्षय चव्हाण असे गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार केल्यानंतर आरोपी फॉर्च्यूनर गाडीतून फरार झाले. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी त्यांना लोणीकंद परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त थोड्या वेळातच