न्हावरे : एका व्यक्तीने आंबळे (ता.शिरूर)येथील महिलेच्या घरात घुसून “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत तिच्याशी लैंगिक चाळे करुन त्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
भानुदास चंद्रकांत अनुसे (रा.अनुसेवाडी-कळवंतवाडी,ता.शिरूर, जि.पुणे) असे आरोपीचे नाव असून, आरोपीच्या विरोधात शुक्रवारी (दि.१४) शिरूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आंबळे येथील श्री.स्वामी समर्थ हॉटेल समोर पिडीत महिलेचे घर आहे.पिडीत महिला घरी असल्याचे पाहून भानुदास अनुसे याने महिलेच्या घरी जाऊन तिचा हात धरला व तू मला खूप आवडतेस असे म्हणत तिच्याशी लैंगिक चाळे करुन लज्जास्पद कृत्य केले.तसेच महिलेला व तिच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे अनुसे याच्या विरोधात शिरूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करत आहेत.