शिक्रापूर (पुणे) : रांजणगाव सांडस (ता. शिरुर) येथे महिलेचा छळ केल्याप्रकरणी पती, नणंद व सासू यांच्याविरुध्द शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरती लक्ष्मण पाटोळे (वय २१ रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीची नणंद पूजा निलेश अवघडे, पती लक्ष्मण तानाजी पाटोळे व सासू सुमन तानाजी पाटोळे (तिघे रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरती पाटोळे या घरात असताना त्यांचे पती, नणंद व सासू यांनी तू नणंद पूजा हिच्या मुलांकडे लक्ष का देत नाही असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने तसेच रबरी पाईपने मारहाण करत जखमी केले. पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहेत.