नवीन पनवेल : ३५ वर्षीय महिलेच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार करत तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सचिन सुरेश सावंत (रा. दापोली, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांना पैशाची गरज आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन गेल्या ऑक्टोबरमध्ये आरोपीने काही रक्कम देण्यासाठी पीडित महिलेला पनवेल येथे भेटायला बोलावले आणि त्यांना ५० लाखांचा चेक दाखवून हॉटेलमध्ये आली तरच चेक देईन, असे सांगितले. यावेळी आरोपीने तिच्यासोबत हॉटेलमध्ये अत्याचार केला. त्यानंतर आरोपी हा पीडित महिलेला वारंवार भेटायला बोलवत होता. मात्र, ती नकार देत असल्याने २७ नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडितेचा अश्लील फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.