-अमिन मुलाणी
सविंदणे (पुणे) : घर बांधण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहितेला हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली आहे. याप्रकरणी पत्नीने सासरच्या लोकांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरळगाव (ता. शिरूर) येथील प्रीती निलेश सात्रस , (वय- 28) यांना सासरच्या लोकांकडून घर बांधण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये असे म्हणत तसेच मला मुलगी झाल्यामुळे माझ्या पतीने एक वर्षापासून माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत तसेच माझ्या माहेरचे घरच्यांना समजावण्यासाठी आले असता मंगळवार (दि. 17) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पती- निलेश सात्रस, सासू- सुनिता सात्रस, सासरे- अनिल सात्रस (सर्व रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी मला व माझ्या आई-वडिलांना हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.
पुढील कार्यवाही शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थेऊरकर करत आहेत.