Winter Assembly Session : नागपूर : अधिवेशन म्हटलं की सभागृहात वाद आणि आरोप प्रत्यारोप रंगतात. यावेळीही होणारच मात्र, नवा ट्रेंड रंगतोयत की काय? असं चित्र सध्या उभं राहिल आहे. कारण नागपुरात यंदा एक नाही, दोन नाही तर, तब्बल शंभर मोर्चे निघणार आहेत. आकडा तर त्याहून अधिक असल्याच सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 48 मोर्च्यांना प्रशासनाने परवानगी दिली असून 70 मोर्चे हे परवानगीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे विषय , सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक विषय या मोर्च्यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडले जाणार आहेत. काही विषय निकाली निघतील तर काही प्रतीक्षेत राहतील.
मराठा आरक्षणाला घेऊन राज्यच राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. त्यानंतर बंजारा समाज पहिल्याच दिवशी विधभावनावर बोगस जात प्रमाणपत्रांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीला घेऊन मोर्चा काढत आहे. गोर सेने संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात मोर्चा काढत आहे. सोबत पहिल्याच दिवशी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा आहे, तांत्रिक अप्रेंटिक्स कंत्राटी कामगारांचा मोर्चे देखील निघणार आहे.
12 डिसेंबरला सर्वात मोठा मोर्चा
जुनी पेन्शनला घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा मोर्चा 12 डिसेंबरला असणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी याा प्रश्नांवर नाना पाटोले यांच्या नेतृत्वात नागपूरच्या रस्त्यावर उतरणार आहे. यासह 11 डिसेंबरला आदिवासी व धनगर समाजाच्या मोर्चांसह तब्बल 17 मोर्चे निघणार आहे. यासह पुढील काळात कलार समाज, नाभिक समाज, लहुजी सेने यांचे सामाजिक मागण्यांना घेऊन मोर्चे निघणार आहे. शाहीर कलावंताचा मोर्चा देखील सांस्कृतिक मागणीचे प्रतिनिधी करणार आहे.