IND vs AUS : भारताकडून पहिल्या डावाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे. गेल्या काही सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाची खराब कामगिरी अनुभवायला मिळाली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्व गडी बाद 474 धावा केल्या. त्यात भारताची सुरुवातच निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरला आणि अवघ्या तीन धावा करून तंबूत परतला. त्यानंतर केएल राहुलही काही तग धरू शकला नाही. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने चांगली भागीदारी केली. या दोघांमध्ये 102 धावांची भागीदारी. यशस्वी जयस्वाल 82 धावांवर असताना धावचीत झाला आणि सामन्याचं चित्रच पालटलं. त्यानंतर आकाश दीपला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आलं, पण त्याच्याही फार वेळ निभाव लागला नाही.
विराट कोहली 86 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 36 धावा करून बाद झाला. तर आकाश दीपला आपलं खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे भारताचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यातल्या त्यात सन्मानजनक पद्धतीने पराभव व्हावा ही क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 275 धावा करायच्या आहेत. आता भारताच्या 164 धावा झाल्या असून अजून 111 धावांची आवश्यकता आहे. पाच गडी हातात शिल्लक असताना या धावा गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. ऋषभ पंत नाबाद 6 आणि रवींद्र जडेजा नाबाद 4 धावांवर खेळत आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप