मुंबई : मुंबईत एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पाच वर्षाच्या मुलासमोरच पत्नीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. योगिता वेदवांशी असे या मृत महिलेचे नाव आहे. मुंबईच्या मलबार हिल परिसरात ही धक्कायदायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई्च्या मलबार हिल येथील शिवाजी नगर परिसरात मृत योगिता वेदवांशी त्यांच्या पत्नी मुलासह वास्तव्यास होत्या. योगिता यांचे सहा वर्षापुर्वीच लग्न झाले होते. योगिता यांच्या लग्नाची सुरूवातीचे काही वर्ष खुप चांगली गेली. परंतु, लग्नाच्या काही वर्षानंतर योगिता यांच्या पतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरूवात केली. या संशयावरून त्यांच्यावर सतत भांडण व्हायला सुरूवात झाली होती.
रात्री सुमित दारू पिऊन घरात आला होता. त्यामुळे नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचा आवाज ऐकूण झोपलेला मुलगा जागा झाला. तरीही दोघांमधलं भांडण सुरूच होतं. याच भांडणात पतीने योगिताच गळाच दाबला आणि तिचा त्यात मृत्यू झाला होता.
आपल्यामुळे आपल्या बायकोचा जीव गेल्याचे पती सुमितच्या लक्षात आल्यानंतर तो तिच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी मलबार हिल पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. तसेच पोलिसांनी नवरा सुमितला ताब्यात घेतले आहे. मलबार हिल पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.