Snake : साप हा सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. त्यांनी जर त्यांची जीभ बाहेर काढली तर ते आणखी धोकादायक दिसतात. तुम्ही अनेकदा सापांना जीभ बाहेर काढताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? साप किंवा त्याच्या प्रजातीचे प्राणी पुन्हा पुन्हा जीभ का बाहेर काढतात? नेमक कारण काय? चला तर मग जाणून घेऊया.
लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार, जर एखादा साप वारंवार जीभ बाहेर काढत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, तो आपल्या जिभेच्या मदतीने बाहेरील वातावरण टिपत आहे. म्हणजेच तो वास घेऊन आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेत असतो. यामध्ये प्रामुख्याने तापमान आणि इतर बदलांचा समावेश आहे. तसेच परिसरातील संकटाचा अंदाज देखील घेत असतो.
साप आपल्या जीभेचा आणखी दुसऱ्या एका कारणासाठीही उपयोग करतात. ते दुसरं कारण म्हणजे आपली शिकार पकडण्यासाठी साप चपळाईने आपल्या जीभेचा वापर करतात. पण त्यांच्याकडे वास घेण्याची प्रचंड क्षमता असते. शिकार तसेच शोध घेण्यासाठी त्यांच्या जीभेचा वापर करतात.
जेव्हा साप आपली जीभ हलवतो तेव्हा तो हवेत तरंगणाऱ्या छोट्या ओलाव्याच्या कणांमध्ये असलेला गंध गोळा करतो. याशिवाय सापाला पाहण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे ते आपल्या बचावासाठी जीभेचा उपयोग करतात. साप आपले डोळे उघडे ठेऊनच झोप घेतात. सापाचा जबडा खूप मोठा असतो. त्याचा उपयोग करुन साप मोठमोठे भक्ष गिळतात.
जेव्हा साप आपली जीभ हलवतो तेव्हा तो हवेत तरंगणाऱ्या छोट्या ओलाव्याच्या कणांमध्ये असलेला गंध गोळा करतो. यानंतर, सापाच्या तोंडाच्या वरच्या भागात असलेल्या जेकबसन ऑर्गन नावाच्या अवयवामध्ये जीभ घालतो. यानंतर साप जिभेने हे कण अवयवामध्ये टाकून मेंदूला याची माहिती पाठवतो. यानंतर तिथे असलेले रसायने रेणूंशी संलग्न होवून हा वास उंदराचा आहे की इतर कोणत्याही प्राण्याचा आहे ते ओळखतात.म्हणून साप पुन्हा पुन्हा जीभ बाहेर काढतात.