NDA Govt : राष्ट्रवादील मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक असून फडणवीस देखील या बैठकीला गेले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांची फडणवीसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा असून, या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अजित पवारांचा मंत्रिमंडळातील सहभाग नेमका कशामुळे खोळंबला? याचे कारण समोर आले आहे. एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे अशक्य असल्याने मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबला अशी माहिती समोर येत आहे.
एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी मात्र निराशा आली आहे. राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे इच्छुक उमेदवार होते. प्रफुल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तबही करण्यात आले होते. परंतु सकाळी अनेकांना महाराष्ट्रातील सहा नेत्यांना फोन आले. मात्र राष्ट्रवादील आला नाही.
एक खासदार असणाऱ्या पक्षांची संख्या सात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रीपद देण्याबाबत सुद्धा महायुतीला अडचणी येत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळात सहभाग झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर संधी मिळाली तर इतर घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता आहे, कारण देशात 1 सदस्य निवडून आलेले 7 पक्ष आहेत.
महायुतीसमोर मोठा पेच
राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे उमेदवार इच्छुक होते. दोन्ही असल्याने राज्यमंत्रीपद देण्याबाबत सुद्धा महायुतीला अडचणी येत होत्या. शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार असूनही त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळत असल्याने दुसरीकडे केवळ 1 खासदार असणाऱ्या राष्ट्रवादीला कॅबिनेट कसं द्यायचं असा पेच निर्माण झाला आहे.