मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. धनश्री सहस्त्रबुद्धे असं महिलेचं नाव असून ही महिला घरी एकटीच राहते. ही महिला देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, या महिलेने उद्विग्नतेतून हल्ला केलाय का? हे जाणून घेऊ.
धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेचे आई वडिल काही वर्षापुर्वीच मरण पावले आहेत. या महिलेनं काल रात्री इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा तोडला. सीसीटीव्हीमार्फत महिलेची ओळख पटली आहे. फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला दादरमधील एका सोसायटीतील राहिवासी आहे. दादरमधील सोसायटीत देखील ती चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. सोसायटीमध्ये देखील ती लोकांच्या दारावर झाडू मारत फिरत असते. तिच्या अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, अशी माहिती भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी दिली आहे.
अभिनेता सलमान खानसोबत मला लग्न करायचंय, नंबर द्या..
तसेच या महिलेला सलमान खान सोबत लग्न करायचं आहे. ही महिला पूर्ण सोसायटीसाठी डेंजर आहे. तिचं कुणीच नाही. ती एकटी राहते. तिचं लग्न झालेलं नाही. ती असंच वागते. तिची बहीण देखील सोडून गेलेली आहे. तिची मोठी बहीण देखील तिला घाबरुन इथे राहत नाही. मानसिक अस्वस्थ कुणीही होऊ शकतं. त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे, त्या मेंटली डिस्टर्ब असल्याचे दादरमधील रहिवाशांचं म्हणणं आहे.