नवी दिल्ली : रविवारी लखनऊ येथे पार पडलेल्या बसपच्या बैठकीत बसपा प्रमुख मायवती यांनी उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली. त्यांचा भाचा आकाश आनंद यांची म्हणून निवड मायवती यांनी उत्तराधिकारी म्हणून केली आहे. रविवारी लखनऊ येथे पार पडलेल्या बसपच्या बैठक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी बोलावण्यात आली होती. आकाश उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सोडून सर्व देशात पक्ष वाढीसाठी काम करणार आहेत. मायवती यांनी यूपी आणि उत्तराखंडची जबाबदारी सध्यातरी स्वत:कडे ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर आकाश आनंद कोण आहे? हे जाणून घेऊयात.
आकाश आनंद कोण आहेत?
२८ वर्षीय आकाश हे मायवती यांचे बधू आनंद कुमार यांचे पुत्र आहेत. आकाश यांनी लंडनमधून एमबीएमध्ये पदवी घेतली आहे. २०१७ मध्येच मायावतींनी त्यांना राजकारणात आणलं होतं. तेव्हापासून पक्षाच्या निर्णयामध्ये त्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. तसेत अनेक दिवसांपासून बसपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते दिसत होते. २०१९ मध्ये त्यांना बसपचा उपाध्यक्ष करण्याचा निर्णय झाला होता. पण, नेपोटिझममुळे आकाश यांनी पद घेण्यास नाकारले होते, असं मायावती यांनी सांगितलं होतं.
पक्षाची वाढ करण्याचा ते प्रयत्न करतील अशी आशा बसप कार्यकर्त्यांना आहे. त्याशिवाय, २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्या समोर ठेवून त्यांना संधी देण्यात आल्याचं बोललं गेललयं. २०१९ च्या लोकसभा निवडणुतीत आकाश यांनी पक्षाच्या निवडणुकीच्या रणनीतीची धुरा सांभाळली होती. तर २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचा सोशल मीडिया विभाग सांभाळला होता.