पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्राकडून देशाला आज अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. राज्यात आज (बुधवारी)सकाळी ११ वाजता राज्यात समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमा’त सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले
स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी तर ते बंधनकारक आहेच, मात्र सर्व ठिकाणच्या नागरिकांनीही यात भाग घेणे अपेक्षित आहे.
दरम्यान, राज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असा आदेशही त्यांनी दिला.