दिल्ली : 2025 या वर्षीच टीम इंडियाचं वनडे, टी20 आणि टेस्ट मालिकेचं वेळापत्रक समोर आलं आहे. 2025 या वर्षात टीम इंडिया इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश यांच्यासोबत मालिका खेळणार आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धा खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉर्मेटमध्ये, तर आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पाचवा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान (सिडनी) खेळवला जाणारा आहे.
भारतीय संघ 2025 या वर्षात पाच वनडे मालिका खेळणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. तर दोन मालिका घरच्या मैदानावर तर दोन विदेशात खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध 3 सामने (होम ग्राउंड), चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (दुबई), बांगलादेशविरुद्ध 3 सामने (भारताबाहेर), ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामने (भारताबाहेर), दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 3 सामने (होमग्राउंड) असं वनडे मालिकेचं वेळापत्रक आहे.
भारत 2025 या वर्षात पाच टी20 मालिका खेळणार असून यामध्ये आशिया कप 2025 चा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका (होमग्राउंड), बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका (भारताबाहेर), आशिया कप 2025, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका (भारताबाहेर), दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका (होमग्राउंड) असं वेळापत्रक आहे.
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणार की नाही हे अजून निश्चित झालेले नाही. कदाचित टीम इंडियाच्या पदरी निराशा पडेल असं दिसत आहे. 2025 वर्षात बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठली तर एक सामना खेळेल. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका (भारताबाहेर), वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका (होमग्राउंड) आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका (होमग्राउंड) असं वेळापत्रक असेल.
टीम इंडियाकडून नववर्ष 2025 मधून फार अपेक्षा आहेत. खासकरून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने यश मिळवावं अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे. कारण मागच्या पर्वात पाकिस्तानने भारताचा अंतिम फेरीत धु्व्वा उडवला होता. त्यामुळे टीम इंडियाचं विजयाचं स्वप्न भंग झालं होतं.
भारत विरुद्ध इंग्लंड (5 टी20, 3 वनडे)
पहिला T20I: 22 जानेवारी (चेन्नई)
दुसरी T20I: 25 जानेवारी (कोलकाता)
तिसरा T20I: 28 जानेवारी (राजकोट)
चौथा T20I: 31 जानेवारी (पुणे)
पाचवा T20I: 2 फेब्रुवारी (मुंबई)
पहिली वनडे: 6 फेब्रुवारी (नागपूर)
दुसरी वनडे: 9 फेब्रुवारी (कटक)
तिसरी वनडे: 12 फेब्रुवारी (अहमदाबाद)
चॅम्पियन्स ट्रॉफी – फेब्रुवारी-मार्च 2025
भारत विरुद्ध बांगलादेश: 20 फेब्रुवारी (दुबई)
भारत विरुद्ध पाकिस्तान: 23 फेब्रुवारी (दुबई)
भारत विरुद्ध न्यूझीलंड: 2 मार्च (दुबई)
उपांत्य फेरी (पात्र असल्यास): 4 मार्च (दुबई)
अंतिम (पात्र असल्यास): 9 मार्च (दुबई)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (पात्र असल्यास)
11 ते 15 जून 2025 (लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड)
भारत विरुद्ध इंग्लंड (5 कसोटी)
पहिली कसोटी: जून 20-24 (हेडिंगली)
दुसरी कसोटी: जुलै 2-6 (एजबॅस्टन)
तिसरी कसोटी: जुलै 10-14 (लॉर्ड्स)
चौथी कसोटी: जूलै 23-27 (मँचेस्टर)
पाचवा कसोटी: 31 जुलै ते 4 ऑगस्ट (ओव्हल)
भारताच्या इतर मालिका
भारत वि बांगलादेश (3 वनडे, 3 T20I) – ऑगस्ट 2025
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (2 कसोटी) – ऑक्टोबर 2025
आशिया कप T20 स्पर्धा – ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (3 वनडे, 5 टी20) – नोव्हेंबर 2025
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2 कसोटी, 3 एकदिवसीय, 5 T20) — नोव्हेंबर-डिसेंबर.