Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“कुणालला नेमकं काय हवं होतं?” खवड्या डोंगर प्रकरणात 5 दिवसांनी बहिणीचा धक्कादायक दावा, सांगितलं सत्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 August 2026, 15:33

पुणे : रक्षाबंधन सणाच्या तोंडावर खवड्या डोंगर घटनेतील कुणाल, त्याची आई संगीता आणि वडील मुरली काका यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंब दुःखाच्या सागरात बुडाले आहे. “या सणाला माझा भाऊ कुणाल माझ्यासोबत नाही, हे दुःख मी शब्दांत मांडू शकत नाही,” अशा अत्यंत भावुक शब्दांत कुणालच्या मावस बहिणीने आपली वेदना व्यक्त केली. या कठीण प्रसंगात सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांमुळे कुटुंबाला अधिकच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कुणालच्या मावस बहिणीने समोर येत माध्यमातून पसरणाऱ्या सर्व आरोपांचा स्पष्ट शब्दांत धिक्कार केला आहे. तिने असं सांगितलं आहे की, कुणालकडे स्वतःचा आयफोन 15 प्रो आधीपासूनच उपलब्ध होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला लहानपणापासून कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. त्यामुळे पैशांसाठी त्याने हे पाऊल उचलल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.जमिनीच्या वाटणीवरून किंवा बहिणीच्या नावावर जमीन केल्यामुळे कुणाल नैराश्यात होता, हा आत्याने केलेला आरोप तिने पूर्णपणे फेटाळून लावला.

कुणालला कोणतीही मालमत्ता किंवा संपत्ती नको होती, तर त्याला फक्त आपले वडील सोबत हवे होते. गेल्या 20 वर्षांत ज्या आत्याने कधी विचारपूस केली नाही, ती अचानक जवळ आली आणि मुरली काकांना कुटुंबापासून दूर नेऊ लागली. मुरली काका स्वभावाने अत्यंत निर्मळ आणि साधे असल्याने कोणावरही सहज विश्वास ठेवायचे. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन वडिलांना आपल्यापासून दुरावले जात असल्याची भीती कुणाल आणि त्याच्या आईला सतावत होती.

“आम्ही आमचा भाऊ, मावशी आणि काका अशा तिघांनाही गमावले आहे. हे दुःख सहन करणे आधीच कठीण असताना, ज्या गोष्टी मृत व्यक्तींनी कधी केल्याच नाहीत, त्या त्यांच्याशी जोडून त्यांची बदनामी करू नका,” असे आवाहन बहिणीने केले आहे. सणाच्या काळात दुःखात असलेल्या या कुटुंबाबाबत कोणतीही अपुरी माहिती न पसरवण्याची आग्रही विनंती केली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

येरवडा जेलमध्ये झाली ओळख, बाहेर येताच सुरू केला खेळ; बाहेर येताच 60 वर्षीय अधिकाऱ्याला 86 लाखांचा गंडा

Friday, 28 August 2026, 14:36

दररोज 500 रु परताव्याचं आमिष; पुण्यात डॉक्टर-व्यापारी दाम्पत्याने घातला तब्बल,33 लाखांचा गंडा!

Friday, 28 August 2026, 14:36

भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी ग्रामस्थांचे नुकसान टाळून मार्ग काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Friday, 28 August 2026, 14:17

“मराठे चिडले तर… तळतळाट घेऊ नका!” जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; उद्यापासून तीव्र आंदोलनाची हाक

Friday, 28 August 2026, 14:16

सागामध्ये अडकलेले 37 भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

Friday, 28 August 2026, 14:11

भरधाव कारने स्कूटीला उडवलं; बारामतीत दोन महिलांचा मृत्यू

Friday, 28 August 2026, 14:08
Next Post

MPSC पेपरफुटीच्या कटाचा पर्दाफाश! आयोगातील 3 अधिकाऱ्यांसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp