पुणे : अॅपद्वारे कार पुरवणाऱ्या ओला कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कपात होणार आहे.एका अहवालात म्हटले आहे की ओलामध्ये 400-500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर वार्षिक कामगिरीच्या आधारे होणारे मूल्यांकनही (अप्रेजल) स्थगित ठेवण्यात आले आहे.हा अहवाल अशा वेळी आले आहेत जेव्हा ओला समूहाच्या व्यवस्थापनात प्रचंड गोंधळ सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत एकापाठोपाठ एक अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
ओला जुनी कार विक्री, क्लाउड किचन आणि किराणा सामान डिलिव्हरी हे तीन व्यवसाय बंद करत असल्याच्याही बातम्या आहेत.
ओलाने एप्रिलमध्येही नोकऱ्या कमी केल्या होत्या. अलिकडच्या काही महिन्यांत इतर अनेक भारतीय स्टार्टअप्सनीही कर्मचाऱ्यांना गुलाबी स्लिप्स (नोकरी सोडण्याची नोटिस) दिल्या आहेत. यामध्ये एडटेक फर्म बायजू आणि वेदांतूसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
दरम्यान ओला लवकरच इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे हे देखील महत्त्वाचे आहे. कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सेबीकडे IPO साठी अर्ज करू शकते.