पुणे : राज्यात थंडीचा जोर कमी झाला असून अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. आज (दि.29) मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, आजपासून राज्यात वातावरण कोरडे होण्यास सुरुवात होणार असून काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. आज राज्यात वातावरण काहीसे ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून
वर्तवण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली होती. तसेच ढगाळ वातावरणासह हवेत गारवा होता. राज्यात शुक्रवारी व शनिवारी काही भागात हलक्या सरींचा पाऊस झाला होता. त्यामुळे तापमान वाढले होते. आता येत्या काही दिवसात हवामान पुन्हा कोरडे होणार असून किमान तापमानात घट होणार असल्याचं वर्तवण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पंजाब आणि आजुबाजूच्या परिसरात स्थिरावली आहे. अरबी समुद्रात असणारा चक्राकार वाऱ्यांचा पट्टा पुढे सरकला असून उत्तर कोकण भागात आहे. परिणामी कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढली आहे. तसेच दुसरीकडे वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत असून हिमालयीन भागात हलक्या पावसासह बर्फ पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे 30 डिसेंबरपासून पुन्हा थंडीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
आली आहे.
पुढील दोन दिवसात राज्याच्या हवामानात मोठे बदल होणार असून पावसाचा इफेक्ट ओसरणार आहे. रविवारी काही भागात हलक्या पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी येत्या दोन दिवसात हवेतील कोरडेपणा वाढणार आहे. पुन्हा एकदा गुलाबी थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून(सोमवार) राज्यात कोरड्या वाऱ्यांचा झोत वाढणार असून तुळळक भागात हलका पाऊसही असण्याची शक्यता आहे.
तापमान येत्या दोन दिवसात पुन्हा घट..
किमान व कमाल तापमान येत्या दोन दिवसात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. रविवारपासून मात्र संपूर्ण आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी विरळ धुके पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी थंडीची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज (शनिवारी) मात्र कमाल तापमान स्थिर राहणार असून, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.