(Weather News) पुणे : हवामाना विभागाने अवकाळी पावसाचा इशार खरा ठरला असून राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यापावसामुळे राज्यातील २५ जिल्ह्यांमधील तब्बल १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाल्याची माहिती समोर आली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे पंचनामे उशीर होण्यास वेळ लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने पंचनामे वेगाने होतील अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याती २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तर जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
राज्यात ४ ते ९ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यातील ८ हजार ९६६ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत असतानाचा पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
त्यानंतर या पिकांचे पंचनामे होणे अपेक्षित असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्याचा सर्वाधिक फटका नुकसानीच्या पंचनाम्यांना झाला. त्यानंतर पुन्हा अवकाळीचा फटका बसला. १५ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळीमुळे राज्यातील सुमारे १ लाख ५५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्या खालोखाल जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले आहे.
जिल्हानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टरमध्ये)
नांदेड २३८२१, परभणी २४००, लातूर ११७९५, हिंगोल ५६०४, अमरावती १५१७, यवतमाळ ६५३९, बुलढाणा ३१४७, वाशिम ४९८१, अकोला ६४३, वर्धा ८६
ठाणे ११७, पालघर २०१७, रायगड ४३२, सिंधुदुर्ग ४३, नाशिक ४२७५, धुळे ९०१७, नंदुरबार १८१४, जळगाव ९५२९, नगर १२१९८, पुणे ५७९, सोलापूर ३९७७, सातारा ४८४, संभाजीनगर ७७६२, बीड ११३६५, जालना १५०८०, : एकूण १३९२२२
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
राज्यात येत्या शनिवार पासून अवकाळी पाऊस ; हवामान विभागाचा अंदाज..!
भारताच्या मदतीला पाऊस आला धावून, लढत थांबली!