पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या बुधवारी (दि. ६ फेब्रुवारी) दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. के. के. मार्केट परिसर, बिबवेवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्काॅन मंदिर येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे.
त्यामुळे के. के. मार्केट परिसर, बिबवेवाडी, राजीव गांधीनगर, अप्पर आणि सुप्पर इंदिरानगर, कोंढवा बुद्रुक, कात्रज आणि कोंढवा यासह दक्षिण पुण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (७ मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद
कोंढवा बुद्रुक, अप्पर इंदिरानगर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर, सुप्पर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, माळवे गार्डन परिसर, श्रेयसननगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, गुलमोहर काॅलनी, अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर डेपो, महानंदा सोसायटी परिसर, गुरूकृपा काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, श्रीकुंजनगर, पुण्याईनगर, बालाजी नगर, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर आणि लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज परिसर, राजयोग सोसायटी परिसर, लोकेश सोसायटी, विश्वशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदरनगर, हस्तीनापुरम, मनमोहन पार्क, तोडकर रेसिडन्सी परिसरा, स्टेट बँक काॅलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजापार्क, लेकटाऊन, चैत्रबन वसाहत, चिंतामणीनगर भाग एक आणि दोन या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.