पुणे : उन्हाळा वाढता शहरातील सर्वच भागातून पाण्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे पण ज्या दिवशी पाणी येणार असते,त्या दिवशी शहरातील अनेक भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून येत असतात. या पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले असताना आता शहराला सध्या दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही असं महापालिकेच्या आयुक्तांनी स्पष्ट सांगितल आहे. त्यामुळे नागरिकापुढे पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
सध्या दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही. शहरामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. ‘एमआयडीसी’कडून २० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. पूर्वी तो ३० एमएलडी होता. तर, आंद्रा धरणातून ८० एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. जलसंपदा विभागाची ७३ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरण्यात आली आहे. अद्याप ६० कोटी रुपये बाकी असून, त्याबाबत निर्णय व्हायचा आहे. जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी देताना औद्योगिक दर आकारला आहे. पाण्याचे अन्य स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. असं स्पष्टीकरण महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिल आहे.
दरम्यान नागरिकांच्या पुढे पाण्याचा मोठा प्रश्न असताना आता क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा व विद्युतविषयक दुरुस्तीची विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे 3 एप्रिलला सकाळचा पाणीपुरवठा नेहमीच वेळेनुसार होणार आहे तर संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं पाणीपुरवठा विभागाने सांगितल आहे.