पुणे : चंदननगर पोलीस ठाण्यात तीन ते चार फुट पावसाचे पाणी शिरल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची चांगलीच तारांबळ उडाली. जोरदार पावसाचा फटका यावेळी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व तक्रारदार यांना बसला आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या आतील बाजूला व बाहेरच्या बाजूला कमीत कमी तीन-चार फुट पाणी साचले होते. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी टेबलावर बसुन आपले कर्तव्य बजावत होते.
दरम्यान. पुणे महानगरपालिकेने नाले सफाई केल्याचा दावा फोल गेला असल्याचे यावरून दिसून आले. मागील वर्षीही अशीच परिस्थिती या पोलीस ठाण्यावर आली होती. त्यावेळी संगणक तसेच महत्त्वाच्या फाईली पाण्यामध्ये भिजल्या होत्या. अग्निशमन दलाचे जवान सदर ठिकाणी पोहोचून दोन मोटर पंपाच्या सहाय्याने पाणी उपसण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.