देहूगाव(पुणे) : जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त ग्रामस्थांसह २७ नोव्हेंबरपासून मुख्य मंदिरासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. गायराण जमीन ही फक्त वारकरी संप्रदाय आणि देहू नगरपंचायतीच्या विकासासाठी आरक्षित ठेवण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. या उपोषणाला अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, उपोषणाचा आज पाचवा दिवस उजाडला तरी सरकारने याकडे डोकावून ही पाहिलं नाही. यामुळे देहूकर आता आक्रमक झाले असून आज देवस्थान आणि ग्रामस्थांनी देहू बंदची हाक दिली आहे. उद्या देहूतील मार्ग चहुबाजूंनी बंद केले जाणार आहेत. त्यानंतर ही सरकार जागं झालं नाही तर वारकरी सांप्रदाय महाराष्ट्र बंद ठेवण्याच्या तयारीत आहे.
वारकऱ्यांची मागणी काय?
श्रीक्षेत्र देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविक भक्तांच्या राहण्यासाठी गायरान जमीन आरक्षित ठेवण्यात यावी, वारकरी संत विद्यापीठासाठी निर्माण करावे, तसेच संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा, तुकाराम बीज, कार्तिकी यात्रा, आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या राहुट्या आणि वाहन तळासाठी जागा ठेवण्यात यावी, अद्यावत ग्रामीण रुग्णालय आणि जल शुद्धीकरण केंद्र तयार करावे, एमएसईबीच्या सब स्टेशन तसेच घन कचरा व्यवस्थापन, मैदान, गावजत्रा, नगरपंचायत प्रशकीय इमारत, अग्निशामक केंद्र, स्मशान भूमीसाठी जागा आरक्षित ठेवावी या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.
अन्यथा या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात
शासकीय संस्थेसाठी गायरणाची जमीन देण्यास देहूगाव ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या मागणीसाठी २३ नोव्हेंबरपासून देहू ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं आहे. जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्र द्यावे, अन्यथा या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण देशात उमटतील, असा इशारा संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिला आहे.