फिरायला जाण्याला प्राधान्य देणारे सध्या अनेकजण आहेत. काहीजण तर देशाबाहेर अर्थात परदेशात जाण्याला खूपच पसंती देतात. तुम्ही देखील देशाबाहेर पर्यटनासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी मालदीव हा बेस्ट आणि स्वस्त पर्याय असू शकतो. कारण, या देशात जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या जास्त आहे.
मालदीव हे एक बजेटमध्ये असणारे परदेशी पर्यटनस्थळ आहे. या देशात एका दिवसाच्या हॉटेलची किंमत सुमारे 7000 ते 10,000 रुपये आहे. त्याच वेळी, खाण्या-पिण्यासाठी दररोज किमान 1,000 रुपये आणि पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी सुमारे 4,500 रुपये खर्च येऊ शकतो. या सर्व खर्चाचा समावेश केल्यास मालदीवमध्ये एका जोडप्याचा एका दिवसाचा खर्च सुमारे 17,500 रुपये असेल. हा खर्च अंदाजे असा असून यामध्ये काही प्रमाणात बदल तुम्हाला दिसू शकेल.
मालदीवमधील मिनी मालदीव म्हणून ओळखला जाणारा हा निळा समुद्रकिनारा स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगसारख्या जलक्रीडामध्ये आवड असलेल्या पर्यटकांसाठी फायदेशीर असा आहे. या बेटांवर ना रस्ते आहेत, ना गावे…सेवा देण्यासाठी मोजकेच तंबू किंवा बीच रिसॉर्ट्स आणि कर्मचारी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लक्षद्वीप बेट भारताचा एक भाग आहे. त्यामुळे येथे भेट देण्यासाठी तुम्हाला वेगळ्या व्हिसाची आवश्यकताही भासणार नाही.