लठ्ठपणा अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे आजारांपासून दूर राहण्यासाठी वजन कमी करण्यावर भर दिला जातो. मात्र, योग्य दिशेने प्रयत्न होत नसल्याने ते प्रयत्न अपयशी ठरतात. पण असे पेय आहेत त्याचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.
नारळ पाणी लठ्ठपणा कमी करण्यावर फायदेशीर ठरू शकते. भरपूर पोषक आणि कॅलरीज खूप कमी असल्याने नारळाच्या पाण्याचे सेवन प्रभावी ठरू शकते. एक ग्लास नारळाच्या पाण्यात 50 कॅलरीज् असतात. अशा परिस्थितीत, वजन कमी करण्यासाठी देखील हे चांगले मानले जाते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने केवळ चयापचय सुधारत नाहीतर ते पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे.
लिंबू पाणी वाढत्या वजनावर गुणकारी ठरू शकते. लिंबू पाण्याचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ते कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते. जेवतानाही तुम्ही ते पिऊ शकता. याच्या सेवनाने तुमची चयापचय क्रिया वाढते आणि वजन कमी करण्यात मदत होते.
जर तुम्हाला कॉफी पिणे आवडत असेल तर कोल्ड ब्रू ब्लॅक कॉफी हा सर्वोत्तम पर्याय आहे. या कॉफीमध्ये फक्त 5 कॅलरीज असतात. ही कॉफी बनवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त स्वीटनर आणि क्रीम वापरले जात नाही. त्यामुळे ही कॉफी इतर पर्यायांपेक्षा चांगली असल्याचे सिद्ध होते आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.