दिनेश सोनवणे
दौंड : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुरकुंभ (ता. दौंड) येथील ग्रामस्थांशी संवाद आज गुरुवारी (ता.२२) साधला आहे.
शारदिय नवरात्र उत्सव सोमवारपासून (ता.२६ ) सुरु होत आहे. कुरकुंभ येथे श्री फिरंगाई माता चे मंदिर असल्याने या ठिकाणी नवरात्रात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्या अनुषंगाने दौंड तालुक्याचे तहसीलदार संजय पाटील दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मंदिर समितीचे ट्रस्टी तसेच गावातील नागरिक, पदाधिकारी, भाविक यांच्याबरोबर बैठक घेतली. आणि यात्रे दरम्यान काय काय उपाययोजना करायच्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊ भाविकांना दर्शन रांगेमध्ये व्यवस्थित दर्शन मिळेल. कुठेही गडबड होणार नाही या बाबत योग्य ती खबरदारी घेतली जाईल. असेदौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आश्वासन दिले आहे.