नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo आपली नवी X 200 स्मार्टफोन सीरीज गुरुवारी (दि.12) लाँच करणार आहे. कंपनी ‘X 200’ आणि ‘X 200 Pro’ हे दोन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. Vivo ने आपल्या वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीझर जारी करून लाँचिंगची तारखेची माहितीही दिली आहे.
Vivo च्या या सीरीजच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 200-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा असणार आहे. हा कॅमेरा कंपनीने जर्मन ऑप्टिक्स ब्रँड Zeiss सह विकसित केला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा भारतातील पहिला 200 MP ZEISS APO टेलिफोटो कॅमेरा असेल. Vivo X200 सीरीजमध्ये ड्युअल प्रोसेसरही मिळणार आहे.
Vivo X200 या सीरीजमध्ये MediaTek डायमेंशन 9400 प्रोसेसर देण्यात येणार आहे. हा फोन Funtouch ऑपरेटिंग सिस्टम 15 वर काम करतो. याशिवाय, यामध्ये Vivo V3+ इमेजिंग प्रोसेसरही उपलब्ध असणार आहे. कंपनीने या व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याचे अनेक फीचर्स समोर आले आहेत.