Pass Away News : उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (त. हवेली) येथील जुन्या पिढीतील विष्णुदास पुरूषवाणी (वय- ९२) यांचे शुक्रवारी (त. ११) पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
जुन्या पिढीतील विष्णुदास पुरूषवाणी वृद्धापकाळाने निधन.
त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उरुळी कांचन येथील विष्णु क्लॅाथ स्टोअर्सचे मालक व उरुळी कांचन येथील सिंधी पंचायत व सेवा समितीचे सदस्य खेमचंद पुरूषवाणी यांचे ते वडील होत.
दरम्यान, विष्णुदास पुरूषवाणी यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. १२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.