Bengaluru News : बेंगळुरूमधील आठ महिन्यांच्या बाळाला मानव मेटाप्नेयूमोव्हायरस (HMPV) ची लागण झाल्याचा संशय आहे, असं वृत्तसंस्था PTI ने सूत्रांकडून दिले आहे. दरम्यान, या बाळाला HMPV ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले, तर भारतात HMPV चा हा पहिला नोंदवलेला रुग्ण असेल.
या बाळाला एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता त्याला विषाणू आढळला आहे. या रुग्णाचे नमुने सरकारच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
गेल्या आठवड्यात भारताने सांगितले की, नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही आणि आरोग्य मंत्रालय देशभरातील श्वसन संसर्गांच्या पसरण्यावर आणि ऋतुबद्ध इन्फ्लूएंझा ट्रेंड्सवर सक्रियपणे लक्ष ठेवत आहे.
चीनमध्ये HMPV च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून लहान मुलं आणि वृद्धांमध्ये संसर्ग आढळून येत आहे. या संसर्गाच्या प्रकोपामुळे कोविड-19 च्या प्रारंभिक काळाशी तुलना केली जात आहे, कारण रुग्णालये आणि आरोग्य केंद्रावर तपासण्या करण्यात येतील अशा बातम्या सर्वत्र प्रसारित होत आहेत.
HMPV नेमका काय आहे?
HMPV एक श्वसन संबंधी व्हायरस आहे. जो मुख्यतः श्वसन मार्गावर परिणाम करतो. या व्हायरसला मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही असं म्हटलं जातं. याची लक्षणे सर्दीसारखी असतात. यामुळे खोकला, नाक वाहणं किंवा घसा खवखवणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. एचएमपीव्ही संसर्ग लहान मुलं आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो. या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते.
चीनमध्ये HMPV च्या प्रकारामध्ये प्रसार वेगाने झाला आहे. ऋतुबद्ध परिस्थितीमुळे थंड हवामानात श्वसन व्हायरसांचा प्रसार वाढतो. तसेच कोविड काळातील सामाजिक अंतर आणि मास्किंगमुळे इतर व्हायरसांच्या विरोधात प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी या व्हायरसचा प्रसार अधिक होण्याची शक्यता असते.
या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय कोरोनासारखे आहेत, मास्क घालणे, गर्दीमध्ये न जाणे, सामाजिक अंतर राखणे, हात धुणे हेच प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
चीनमध्ये पसरलेल्या HMPV विषाणूबद्दल बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, देशात व्हायरल इन्फेक्शन आणि श्वसन रोगांच्या संख्येत वाढ झालेली नाही.
जागतिक स्तरावर या आजारांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांशी देखील संपर्क सधला जात आहे.