लखनौ: सुलतानपूरमधील (Viral News) पूर्वांचल एक्सप्रेसवेवर पार्क (Crime News) केलेल्या कारमधील एका जोडप्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून व्हायरल केल्याप्रकरणी (Trending News) एटीएमएसमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या आशुतोषवर गंभीर आरोप झाले आहेत. त्याच्यावर सीसीटीव्ही फुटेजचा दुरुपयोग करून जोडप्याची गोपनीयता भंग करणं, त्यांना ब्लॅकमेल करणं आणि 32 हजार रुपये उकळल्यानं आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ आणि तक्रारीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. (Breaking News)

मात्र, आशुतोषने संपूर्ण प्रकरणावर मौन तोडत स्वतःवर झालेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला आहे. त्याने सांगितले की व्हिडिओ ज्या दिवशी रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप आहे, त्या दिवशी तो ड्युटीवरच नव्हता. त्याच्या विभागातील दोन-तीन सहकाऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असून संपूर्ण दोष त्याच्यावर ढकलला जात आहे. त्याच्याविरोधात आधीपासून कट रचला जात असून त्याला नोकरीवरून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्याचा आरोप आहे. (Marathi News)
पीडित जोडप्याने स्वतः कोणतीही तक्रार नोंदवलेली नसून त्यांनी स्पष्ट केले आहे की आशुतोषने त्यांच्याकडून कधीही पैसे घेतले नाहीत किंवा धमकी दिली नाही, असा दावा त्याने केला. त्याच्या मते, तक्रारदार हेच काही स्थानिक तरुण असून त्याच्याविरोधात ते बऱ्याच काळापासून कट रचत होते.
स्थानिक महिलांचे चित्रीकरण केल्याच्या आरोपावरही आशुतोषने प्रतिक्रिया दिली. एका प्रसंगी सकाळी पाचच्या सुमारास त्याच्या एका सहकाऱ्याने अशी चूक केल्याचे त्याने मान्य केले. मात्र त्याने सकाळी दहा वाजता कार्यालयात पोहोचल्यावर त्याच्यावर कारवाई केली होती. ही एकच घटना जणू त्याने रोज केली असल्याचा खोटा आरोप पसरवला जात असल्याचे तो म्हणाला.
जोडप्याच्या व्हिडिओवर झूम केल्याबद्दल त्याने स्पष्टीकरण देताना सांगितले की, एक्सप्रेसवेवरील कोणतेही वाहन पार्क आढळल्यास वाहनात काही आपत्कालीन परिस्थिती आहे का हे तपासण्यासाठी झूम करणे ही एटीएमएसची मानक पद्धत आहे. त्यामागे कोणत्याही व्यक्तीची गोपनीयता भंग करण्याचा उद्देश नसतो, असेही तो म्हणाला.
दुसरीकडे, हलियापूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मोहम्मद रफान यांनी या प्रकरणात आशुतोषविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्याच्यावर सीआरपीसी 2023 च्या कलम 308(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएमएस चालवणाऱ्या कंपनीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत आशुतोषला कामावरून काढून टाकले आहे.
हे प्रकरण 8 डिसेंबरला समोर आले, जेव्हा तक्रारपत्र आणि जोडलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यात दावा करण्यात आला होता की नवविवाहित जोडप्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून सहाय्यक व्यवस्थापक आशुतोष यांनी त्यांना दाखवले आणि 32 हजार रुपये मागितले. हा व्हिडिओ नंतर व्हायरल करण्यात आल्याचेही नमूद होते. प्रकरण समोर येताच आणखी काही लोकांनीही असेच आरोप करत पुढे येण्यास सुरुवात केली आहे.






