पुणे : सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं विजय शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटलं आहे. तसेच, अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत, पवार कुटुंबीयांवर शिवतारे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातील महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असलयाचा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णयही शिवतारे यांनी घेतला आहे. आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे? बारामती मतदार संघ कोणाचा सातबारा नाही, असं विजय शिवतारे म्हणाले.
तर लढत तिरंगी होणार?
बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विराधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करणार आहे. तुमच्या सर्वांची साथ हवी, असे म्हणत सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे, असे विजय शिवतारे म्हणाले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणुक तिरंगी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.