Uma Ramanan Death News : तामिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका उमा रमणन (Uma Ramanan) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या पश्चात त्यांचे पती ए.व्ही. रामनन आणि मुलगा विघ्नेश रामनन असा परिवार आहे.
Woke up to the sad news of passing away of singer Mrs Uma Ramanan
In this age of Super Singers and performers where the singers act more than they sing, here is Mrs Uma Ramanan bringing such complex emotions through her voice with zero indications on her face.
What a singer! Om… pic.twitter.com/u9QsRc3VAU
— இந்தா வாயின்கோ – Take That ???? (மோடியின் குடும்பம்) (@indhavaainko) May 2, 2024
उमा रामनन या प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होत्या आणि 35 वर्षांमध्ये त्यांनी सहा हजार हून अधिक मैफिलींमध्ये भाग घेतला होता. जेव्हा त्या त्यांचे पती आणि संगीतकार ए.व्ही. रामनन यांना भेटल्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या मैफिलींसाठी त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली.
निझलगल सिनेमातील त्यांच्या पुंगाथवे थलाथिरवाई या गाण्यानं उमा यांना प्रसिद्धी मिळवून दिली. एका सफल करिअरचा अनुभव त्यांनी घेतला. तब्बल तीन दशकं त्यांनी गायिका म्हणून काम केलं. उमा यांनी पतीसाठी अनेक गाणी गायली असली तरी इलैयाराजा यांच्या सहवासामुळेच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.