उरुळी कांचन : उरुळी कांचनमधील तुपे वस्ती साईनगरमध्ये… जागतिक सर्पदिनी दुपारी नाग व मुंगुस यांच्यात झुंज लागुन ते मानवी वस्तीत आले होते.नाग बचावासाठी छोट्या झाडावर चढला मुंगुस निघुन गेला, पण नाग फणा काढून बसल्यामुळे वस्ती मधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान ज्यांच्या घराजवळ नाग होता त्या आकाश तुपे यांनी सर्पमित्र आणि ऊरुळी कांचनचे ग्रामपंचायत कर्मचारी महेश संजय खुडे यांना बोलावले. त्यांनी त्या नागाला पकडून सुरक्षित स्थळी निसर्गात सोडून दिले. तो कोब्रा जातीचा नाग होता.
सर्पदंश झाला तर मंत्र तंत्र किंवा झाड पाल्याचे उपचार न करता. संबंधीत रुग्णाला वेळ न घालवता. दोन तासाच्या आत जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्याचे त्यांनी आवाहन केले. सरकारी दवाखान्यात antivanum इंजेक्शन असते ते रुग्णाला तातडीने दिले जाते.
साप किंवा नाग दिसल्यास घाबरून जाऊ नका किंवा त्याला मारू नका, परिसरातील सर्प मित्रांना पाचारण करून त्यांच्याकडून त्याची निसर्गात रवानगी करा असे आवाहनही सर्पमित्र श्री खुडे यांनी केले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक विषारी आणि बिनविषारी सापांना निसर्गात सोडले असून 9665964622 क्रमांकावर फोन केल्यास ते उपलब्ध असतात.