मुंबई : महाराष्ट्रात वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प उभारणार आहे. अशी मोठी घोषणा वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केली आहे. हि रात्री सव्वादहाच्या आसपास ट्विटरवरुन दिली आहे. चार वेगवेगळ्या पोस्ट करताना त्यांनी गुजरातची निवड केल्याचे सांगतानाच लवकरच या प्रकल्पाअंतर्गत भारतभर उद्योगांचे जाळे पसरविण्याचा विचार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
Our team of internal & external professional agencies shortlisted few states viz., Gujarat, Karnataka, Maharashtra, TN etc to help achieve our purpose. For last 2 years we have been engaging with each of these govts as well as central govt & have received fantastic support. (2/4)
— Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) September 14, 2022
ते लिहितात, “कोट्यवधी रुपयांची ही दीर्घकालीन गुंतवणूक असून यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची दशा आणि दिशा बदलणार आहे. आम्ही देशभरामध्ये परिसंस्था उभारणार आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्यास कटीबद्ध आहोत. गुजरातपासून सुरु झालेल्या या प्रवासामध्ये देशभरात विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे.”
“आमच्या कंपनी अंतर्गत तसेच इतर संस्थांच्या मदतीने केलेल्या पहाणीनंतर काही राज्यांची नावं पर्याय म्हणून निश्चित करण्यात आली. त्यामध्ये गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूचा समावेस होता. आमचे उद्देश साध्य करण्यासाठी ही राज्य योग्य असतील असा निष्कर्ष निघाला. मागील दोन वर्षांपासून आम्ही या राज्यांमधील सरकारांबरोबरच केंद्र सरकारच्या संपर्कात असून आम्हाला त्यांनी उत्तम पाठिंबा दिला आहे,” असंही अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘वेदान्त-फॉक्सकॉन’चा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटले आहे. त्यानंतर प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकल्पामुळे राज्यातील १ लाख नोकऱ्या बुडाल्या असा आरोप विरोधकांकडून करत सत्ताधाऱ्यांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु याच आरोप-प्रत्यारोपात वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताचे आभार मानत विरोधकांना टोला लगावला आहे.