बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडचे बीड जिल्ह्यातील अनेक कारनामे हळूहळू उघडकीस येत आहे. वाल्मिक कराडची दहशत आणि प्रशासकीय यंत्रणेवरील त्याचा धाक या कारनाम्यातून दिसत आहे. पोलीस यंत्रणेपासून महसूल विभागापर्यंत सर्वच ठिकाणी त्याची वचक असल्याचे पाहायला मिळत आहे. आता सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडचा वाईन पॅटर्न उघडकीस आणला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत वाल्मिक कराड यांची केज, वडवणी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनची दुकाने आहेत आणि प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे. असं त्यात म्हटलं आहे.
वाईन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका
अंजली दमानिया यांनी बीडमधील वाईन दुकांनाचा पॅटर्न उघडकीस आणला आहे. त्यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनची दुकाने आहेत. प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे.
ही जमीन केज येथे २९/११/२४ रोजी घेतली आहे. त्यासाठी १,६९,००,००० रुपये मोजले आहेत. आणि यासाठी वाल्मीक कराडला 3 दिवसांत परवानगी दिली गेली असल्याचं म्हटल आहे. सात बारा १५ दिवसानंतर होतो. पण वाल्मिक कराडसाठी सगळे कायदे कसे धाब्यावर बसवले गेले , याचे हे एक उदाहरण असल्याचं त्या म्हणाल्या.
एक गोपनीय पत्र त्यांना मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना..
काल संध्याकाळी या संबंधित एक गोपनीय पत्र त्यांना मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. याविषयीचे ट्वीट दमानिया यांनी केले आहे.अंजली दमानिया यांनी त्यांच्या मागण्या आणि पत्र मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. त्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचे संबंध, पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, बिंदुनामावली, पवन चक्की यासंदर्भातील काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
धनंजय मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत..
यावेळी अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध, त्यांच्यातील व्यवहार यावर त्यांनी भाष्य केले आहे. इतके सर्व असून सुद्धा धनंजय मुंडे यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवायला हवा, अशा त्या म्हणाल्या.