अजित जगताप
Vaduj News : वडूज : खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीचा विकास नेत्रदीपक व झपाट्याने होत आहे. या विकास कामांमध्ये अनेकांचे योगदान आहे. हे मान्यच करावे लागते. परंतु, दुसऱ्या बाजूला चलता है चलने दो अशी ही मानसिकता बनली आहे. वडूज सारख्या हुतात्मा नगरीतील बस स्थानकामध्ये प्रवासी व स्थानिकांपरिसरातील लोकांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागत असल्याचे विदारक चित्रही पुढे आले आहे. (The condition of the toilet in Vaduj bus stand is pathetic)
प्रवाश्यांना दुर्गंधी करावी लागते सहन,,,,,
याबाबत माहिती अशी की , वडूज नगरीमध्ये शहरा बाहेर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वडूज आगार आहे. त्याचबरोबर वडूज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक एकर परिसरात वडूज बस स्थानक आहे . सुमारे पन्नास मार्गावर दिवसभरात शंभर बस धावत आहेत.काही बस येथे थांबतात.या बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. (Vaduj News) शेकडो प्रवासी तसेच चालक_ वाहक हे वडूज बस स्थानकाला भेट देतात. मानवी नैसर्गिक गरज असल्याने महिलावर्ग ,जेष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना लांबच्या पल्याच्या प्रवासाच्या वेळेला लघुशंकेसाठी बस स्थानकात उतरल्यानंतर स्वच्छतागृह शौचालय शोधण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, आत मध्ये पाऊल टाकण्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त वासने अनेकांच्या तोंडाला फेस येऊ लागलेले आहेत. काही जणांना उलटी व मळमळ सहन करूनच पुढच्या प्रवासाला जावे लागत आहे. ही बाब आता प्रवाश्यांना खटकू लागलेली आहे.
वडूज नगरीमध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्याचे आवड असणारे शेकडो कार्यकर्ते आपापल्यापरीने समाजाचा विकासाचा भार सहन करत आहेत. वैयक्तिक जबाबदारी पार पाडून सामाजिक बांधिलकी ही जपण्यामध्ये वडूज नगरीत हातखंड आहे. दुर्दैवाने मात्र या बस स्थानकातील स्वच्छतागृहाबाबत फारसा कोणी मनावर घेतलेले नाही असे दिसून येते. आपल्याच गावातील भगिनी_ विद्यार्थिनी या शाळा महाविद्यालयासाठी वडूज नगरीत येतात. (Vaduj News) त्यांच्यासाठी स्वच्छतागृह नसल्याने येताना घरी व जाताना शाळा महाविद्यालयातील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. त्यामुळे बस स्थानकातील स्वच्छता ग्रह व शौचालयासाठी विधिमंडळातच आवाज उठवणे गरजेचे आहे का? असा मार्मिक प्रश्न अडाणी व अशिक्षित महिलावर्ग करत आहेत.
खरं म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा जाता येता अभिनंदनचे व शुभेच्छाचे लागणारे फलक म्हणजे काहींच्या बाबतीत न काम करणाऱ्यांच्या कौतुक असा एक समज झालेला आहे. तो खरा ठरवू लागला आहे ? अशी मनाशी खुणगाठ बांधूनच प्रवासी वर्ग वडूज बस स्थानकातून बाहेर पडत आहे. याचा आता कोणी तरी विचार करावे हे सांगण्याची पिढी लोप पावली आहे.
एकेकाळी हुतात्म्यांची नगरी असा गौरवपूर्ण उल्लेख करणाऱ्या वडूज नगरीचा उल्लेख आता अन्याय, गैरसोय शांत व संयमीपणे सहन करणारे नागरिक अशी होऊ लागलेली आहे. एवढेच नव्हे तर ऐनवेळी जर वीजभार नियमन झाले तर हातात मेणबत्ती घेऊन आपले महत्वाचे काम करतील पण आंदोलन करणार नाही. (Vaduj News) तर दुसऱ्या बाजूला दुर्गंधी आपल्याला येऊ नये म्हणून महागडे सेंट मारून बस स्थानकात जातील. याबाबत आता आवाज उठवण्यापेक्षा वडूज बस स्थानक नको रे बाबा असं म्हणण्याची पाळी प्रवाशांवर आली आहे. येथील जबाबदार अधिकारी यांच्या शांत व संयमी वृत्ती बाबत न बोलले बरे असा सूर उमटू लागला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Vaduj News : खटाव मध्ये लढतात गावे सोळा, आता घालू नये श्रेयवादाचा खोडा
Vaduj News : निष्क्रिय कर्मचाऱ्या विरोधात मान्यवरांनी वडूज नगरपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांना विचारला जाब
Vaduj News : वडूज शेती उत्पादन बाजार समिती प्रायोगिक तत्त्वावर बांधणार गाळे..