Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन गावात आश्रम रोड व महात्मा गांधी रस्त्यावर नित्याचीच वाहतूक कोंडी ; पोलीस व ग्रामपंचायत यांची भूमिका “आळी मिळी गुपचिळी”…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 August 2022, 9:57

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन शहरातून जाणार्‍या पुणे – सोलापूर महामार्गाच्या पथकर मार्गावर तसेच उरुळी गावातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी व आश्रम रोडच्या दोन्ही बाजूला पथार्‍या मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आश्रम रोड ते तळवाडी चौक या मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

उरुळी कांचन येथील वर्दळीचे मुख्य रस्ते हे चक्क वाहनतळ झाल्याचे चित्र सध्या उरुळी कांचन शहरात दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरून चालत जाणाऱ्या व्यक्तीला या वाहतूक कोंडीचा तोटा सहन करावा लागत आहे.

 

पुणे – सोलापूर महामार्गाच्या कडेला व्यावसायिक दुकाने असलेल्या इमारती उभारली आहेत. त्या इमारतीत वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ केलेले नाही. त्यामुळे इमारतीत जाणार्‍या लोकांच्या दुचाकी, चारचाकी, वाहने चक्क रस्त्यावर उभ्या केल्या जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होतो व वाहतुकीस अडथळा येत आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून पथकर नावाला असून त्यावरती टपरीवाले, भाजीविक्रेते, आदि विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत.

उरूळी कांचन मधील मुख्य अंतर्गत रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे या रस्त्याची रुंदी कमी झालेले आहे. त्यातच या मार्गावर अस्ताव्यस्त पद्धतीने उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. उरुळी कांचन मधील बहुतेक शाळा सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळे, बँका, निसर्ग उपचार, आश्रम, पतपेढ्या, यांच्याकडे पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने वाहनांची रस्त्यावर पार्किंग केली जाते. या गोष्टीकडे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.

दरम्यान, तळवडी चौकातील वाहतूक व्यवस्था तसेच सेवा रस्त्यावर उभे असणारे खाजगी वाहतूक करणारी वाहने यामुळे जेजूरीकडून सोलापूरसह – पुण्याकडे जाणार्‍या येणार्‍या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या चौकात वाहतूककोंडी नित्याची झालेली आहे. या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने योग्य कारवाई करणे गरजेचे आहे. परिसरात वाहने लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ नाही. त्यामुळे वाहने लावण्यचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश वाहने रस्त्यावरच लावली जातात.

याबाबत उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे म्हणाले, ” उरुळी कांचन ग्रामपंचायतची बाजारपेठ हि मोठी असून या गावात जाण्यासाठी मुख्य दोनच रस्ते आहेत. यावेळी या बाजापेठेत येणाऱ्या व जाणऱ्या व्यापाऱ्यांची, नागरीकांची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपआपल्या दुकानापुढे गाड्या लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायतीला मदत लागल्यास कायम तत्पर आहोत.”

याबाबत उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “व्यापारी भाजीवाले, हातगाड्या असणाऱ्या तसेच पार्किंग होत असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून अतिक्रमणाबाबत माहिती दिली जाते. गणपती उत्साहाच्या काळात अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत त्यांनी पार्किंगची सुविधा करावी. काहीजण अनाठायी तासनतास गाड्या लावून निवांतपणे फिरतात अशा निवांत गाडी लावून फिरणाऱ्यांवर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.”

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

पशुवैद्यक पदवी- पदविकाधारक यांच्यातील वाद सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा - आमदार राहुल कुल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.