उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद अकॅडमी या (CBSC) च्या 10 वीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अशी माहिती शाळेचे प्राचार्य दास यांनी दिली.
या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेचे आणि संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रशालेमधून प्रथम प्राची प्रल्हादराम चौधरी या विद्यार्थिनीने 92.40 टक्के, द्वितीय अझान आरिफ दामटे 92 टक्के, तृतीय प्रेरणा प्रसाद कुंजीर 91.60 टक्के, चतुर्थ संग्राम महेंद्र कांचन 91 टक्के, तर शुभम सतीश सूर्यवंशी याने 89.60 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य दास यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, तसेच संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकवृन्दांचे कौतुक केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.