उरुळी कांचन, (पुणे) : होणार, होणार.. जिल्हा ग्रामीण पोलीस दलात उरुळी कांचन (ता. हवेली) स्वतंत्र पोलीस ठाणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करून स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु होईल असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहे.
भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनच्या वतीने डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून निवेदन दिले असता त्यांनी आश्वासन दिले. लोणी काळभोर व लोणीकंद या ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस ठाण्याच्या समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात १६ मार्च २०२१ ला करण्यात आला होता. राज्य शासनाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.
पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये राहणार आहे. हा निर्णय तात्काळ लागु होणार असल्याने आमदार अशोक पवार यांनीहि पाठपुरावा केला होता. उरुळी कांचन स्वतंत्र तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. हे पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये राहणार आहे. हा निर्णय तात्काळ लागु होणार असल्याने आमदार अशोक पवार यांनीही पाठपुरावा केला होता.
उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. दरम्यान, या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून यामध्ये एक पोलीस निरिक्षक, ४ सहायक पोलिस निरीक्षक, ५ पोलीस निरीक्षक, २० पोलीस हवालदार, पोलीस नाईक २५, तर पोलीस शिपाई ३० पदे भरली जाणार आहेत.
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत असल्याचे चित्र आहे. उरुळी कांचन पोलिस ठाण्याला स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे म्हणून मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी राजकीय हेतूने महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय मोडित काढत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. त्यामुळे उरुळी कांचन पुणे शहर आयुक्तालयात ठेवणार का, मागील सरकारच्या निर्णयाप्रमाणे ग्रामीण भागात राहणार याविषयीची मोठी उत्सुकता जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांत आहे.